
गावाकडे भाकरीला जेवणात महत्त्वाचे स्थान आहे.ज्वारी,बाजरी,नाचणी,तांदूळ,मका अशा वेगवेगळया तृण धान्याच्या भाकरी केल्या जातात.उष्ण व दमट प्रदेशात तान्दळाची तर घाटावर थंड ठिकाणी ज्वारी,बाजरी किंवा नाचणीची तर उत्तरेकडे मक्के की रोटी केलि जाते। जिथे जे धान्य जास्ती पिकते तिथे त्याचा वापर दिसून येतो.उन्हाळयामधे तान्दळाचीकिंवा नाचणीची ,थंडीमध्ये बाजरीची भाकरी खावी असे म्हणतात.
पण जर सगळी धान्ये एकत्र करून त्याचे पीठ केले तर सर्व धान्याचे गुण एकाच भाकरीत येतील नाहीं का? शिवाय सर्व सारख्या प्रमाणात असल्यामुळे कोणत्याही ॠतुमध्ये खायला ती चालू शकेल .म्हणून ही सात धान्याची भाकरी.
भाकरीचे पीठ दळून आणताना मात्र जरा जाडसर दळून आणावे. पीठ भिजवताना थोड़े थोड़े मळून घ्यावे. एकेका भाकरीला लागेल तेवढे. भाकरीचा गोळा मऊ झाला पाहिजे इतका की अगदी सहजपणे भाकरी थापता येइल. भाकरी थापता येत नसेल तर हलक्या हाताने लाटली तरी चालते.भाकरी थापताना आधी मधून थापत मग कडेला थापत नीट वाढवावी. थापताना ख़ाली तान्दळाची पीठी घालावी.तव्यावर घालताना गैस मध्यम ठेवावा आणि पिठाची बाजू वर असू द्यावी, त्या बाजूवर पाण्याचा हात फिरवावा.पाणी सुकत आले की भाकरी परतावी.परतलेली बाजू नीट भाजून घ्यावी.पहिली बाजू तव्यावरून काढून गैस वर फुलवावी.
दशमी करण्यासाठी पीठ दूध किंवा दूध पाण्याने भिजवावे.थापल्यावर पीठ लावलेली बाजू तव्यावर खालच्या बाजूला घालावी.पाणी लावू नये.बाकी कृति फुलक्याप्रमाणेच करावी.
ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तान्दूळ समप्रमाणात घ्यायचे। मका, राजगिरा आणि जव प्रत्येकी पाव भाग घ्यायचे
सर्व एकत्र जरा जाडसर ( भाकरीसाठीं) दळृन आणायचे। म्हणजे प्रत्येकी एक किलो मुख्य धान्य असेल तर प्रत्येकी पाव किलो मका, राजगिरा आणि जव घ्यावे। दळताना मूठभर काळे उडिद टाकले तर पीठ जास्ती टिकते।
याच पिठाचे थालिपिठ्ही सुंदर लगते। थालीपीठ करताना वरील पिठात धने-जीरे पूड , हळद-तिखट, मीठ-साखर/गूळ, बारीक़ चिरलेला कांदा, दही, कोथिम्बिर घालून नेहेमीप्रमाणे थालीपीठ थापावे.
थालीपीठ करताना कधीतरी त्यात कोबीचा/ गाजराचा किस किंवा मेथीची/पालकाची पाने घातल्यास वेगळेपणा येइल
No comments:
Post a Comment