Pages

Wednesday, January 13, 2010

मसाला खिचड़ी


तांदूळ १ वाटी
सालवाली मुगाची डाळ ( नसल्यास साधीसुद्धा चालेल) अर्धी वाटी
वाटाणा/तोंडली/वांगी/बटाटा अशी कोणतीही भाजी -पाव वाटी (चिरून)
अख्खा गरम मसाला (2लवंग, अर्धा इंच दालचिनी,3मिरी,1वेलची,दगड्फूल. १ पाकळी चक्रिफूल,जायपत्री इ।) सर्व थोड्या प्रमाणात घेउन कुटून घ्यायचे
फोडणीला तूप, तमालपत्र आणि जीरे
कृति-
डाळ तांदुळ धुवून निथळवावेत । भांड्यात तुपाची फोडणी करून त्यात तमालपत्र आणि जीरे घालावे। भाजी घालावी जरा परतून मग डाळ तांदूळ घालावे । हळद तिखट चवीप्रमाणे घालून चांगले परतावे .३ ते ३॥ वाट्या गरम पाणी त्यात ओतावे उकळी आल्यावर त्यात कुटलेला गरम मसाला घालावा। पाणी थोडे आटल्यावर झाकण ठेवून मंद गैस करून वाफ काढावी । मीठ घालून भात ढवळावा ओले खोबरे आणि कोथिम्बिर घालून वाढावा। वरुन लिम्बू पिळावे आणि साजुक तूप घालावे। ताकाच्या कढीबरोबर हा चांगला लागतो.

No comments:

Post a Comment