Pages

Monday, January 18, 2010

चपात्या

चपाती लाटणे ही एक art आहे. पीठ कसे भिजवले जाते यावरही चपाती लाटणे अवलंबून आहे. practice ने हेही चांगले जमू शकते.
पूर्वी पीठ दळून आणत असत.अजूनही आणतात. पण बऱ्याच ज़णी हल्ली कामानिमित्त घराबाहेर पडतात त्यामुळे readymade किंवा branded पीठ आणणेच पसंत करतात. जर घरी पीठ करणार असाल तर गहू शक्यतो whitish असावा reddish नको आणि short असावा लांबट नको. दळण बारीक़ दळून आणावे.

साधारणपणे पीठ भिजवताना पिठाच्या अर्धे पाणी लागते. म्हणजे १ वाटी पिठाला १/२ वाटी पाणी.
एक वाटी पिठात एक चिमुटभर मीठ आणि १ चमचा तेल घालावे.चपात्या मऊ होण्यासाठी थोड़े दूध व थोड़े पाणी घ्यावे .सायिसकट दूध घातले तर पिठात तेल घालण्याची गरज नाही. पण पीठ मळून झाल्यावर शेवटी तेलाचा हात लावून मळावे.

चपाती लाटताना तान्दुळाच्या पिठीवर लाटावी.

घडीची चपाती करायची असल्यास आधी छोटा गोल लाटून त्यावर थोड़े तेल घालून हाताने पसरावे व वरून चिमुटभर तान्दळाचे पीठ भुराभुरावे.गोल दुमडावा आणि पुन्हा तेल व पीठी लावावी.अजून एकदा घडी घालावी म्हणजे त्रिकोणी घडी होइल.नंतर चपाती हळुहळू वाढवावी .तवा गरम झाल्यावर गैस मध्यम करावा.चपाती तव्यावर टाकावी चपातीला थोड़े बुडबुडे दिसल्यावर लगेच परतावी. परतलेली बाज़ू तव्यावर नीट भाजून घ्यावी आणि पुन्हा परतावी.आतापहिल्यान्दा अर्धवट झालेली बाजू पूर्ण भाजून चपाती ताटात काढावी। वरून तूप लावावे.

फुलके करायचे असल्यास चपातीपेक्षा लहान लाटावी आणि घडी घालू नये.भाजताना पहिली बाजू अर्धवट भाजून घ्यावी आणि दुसरी बाजू पूर्ण भाजून पहिली बाजू तवा काढून गॅसवर फुलवावी.झाल्यावर ताटात काढून तूप लावावे.

No comments:

Post a Comment