Pages

Wednesday, January 20, 2010

कारल्याची भाजी



मला पूर्वी कारल्याची भाजी अजिबात आवडत नसे.'तुपात तळले आणि साखरेत घोळले तरी कारले कडू ते कडूच' हे डोक्यात लहानपणापासून पक्के बसले होते.कदाचित पहिल्यांदा कधीतरी खाल्ले ते कडू लागले असणार म्हणून ते जास्ती पक्के झाले. आपण नेहेमी जेवणात आम्बट,तुरट,तिखट,गोड़ या चविंचा स्वाद घेतो पण त्या मानाने कडू चव जेवणात फार कमी वेळा येते. पण तीही गरजेची आहे.
जर कारल्याची भाजी करताना काही गोष्टी पाळल्या तर ती अजिबात कडू लागत नाही.
म्हणुनच एकदा खाल्ली की पुन्हा खाविशी वाटेल हे नक्की!

साहित्य
कारली-१/४ किलो
तेल-४ चमचे
मोहरी,हिंग फोडणीसाठी
तीळ(भाजलेले)-१/४ वाटी



कृति

कारली नीट धुवून पुसून घ्यावीत.मधोमध उभी चिरून त्यातील बिया व मधला भाग हाताने काढून टाकावा.आणि कराल्याच्या पातळ चकत्या कराव्यात.सर्व कारली चिरून झाल्यावर त्यावर १-२ चमचे मीठ व अर्ध्या लिम्बाचा रस घालून फासावे.ते तसेच १० मिं ठेवून द्यावे.त्याला पाणी सुटेल.कारली हाताच्या दोन तळव्यांमध्ये दाबावित आणि त्यातील निघेल तेवढे पाणी काढून तकवे.कारली चुरून पाणी काढू नये.
एक पातेलीत तेल गरम करुन हिंग,मोहरीची फोडणी करावी.त्यावर पाणी काढलेली कारली घालावीत.हळद,तिखट घालावे.थोड्या थोड्या वेळाने परतत रहावे.थोड़ी कुरकुरीत होईपर्यंत परतावे.नंतर त्यात भाजलेले तीळ घालावे.भाजी नीट मिक्स करुन गैस बंद करावा.

No comments:

Post a Comment