Pages

Wednesday, January 13, 2010

ताकाची कढी


ताक २ वाट्या
चण्याचे पीठ २ मोठे चमचे
मेथीदाणे १ चमचा
लवन्ग२, मिरी४, दालचिनी १ इंच ,आले किसून १ चमचा ,५-६ कढीपत्ता पाने ,साखर १ चमचा
बोर मिर्ची २-३ किंवा सुकी लाल मिर्ची
तूप,जीरे,हिंग फोडणीसाठी

कृति
अर्धी वाटी पाण्यात चण्याचे पीठ कालवून त्याची पेस्ट करून घ्यावी ती ताकाला लावावी आणि ताकामधे अजून एक वाटी पाणी घालावे। लवंग,दालचीनी,मिरी आले , साखर आणि कढीपत्ता घालून ताकाला उकळी काढावी .जाड झाली की मीठ घालून गैस बंद करावा। पळीमधे तूप जीरे हिंगाची फोडणी करून त्यात सुकी मिर्ची घालून ताकाला वरून फोडणी द्यावी आणि झाकण ठेवावे.

No comments:

Post a Comment