आपल्या हिन्दू धर्मामध्ये सण खूप. व्रत वैकल्यही खूप. म्हणूनच उपवासाचे पदार्थही खूप आहेत । साबुदाणा, शेंगदाणा,बटाटा, वरी किंवा भगर, शिंगाडा, राजगिरा वगैरे त्यात करायला सोपे आणि पोट भरेल असे कही पदार्थ खाली देते .
साहित्य
भाजलेले शेंगदाणे( साल काढून) अर्धी वाटी
खोवलेले ओले खोबरे अर्धी वाटी
आले थोडेसे
हिरवी मिरची/लाल तिखट आवडीप्रमाणे
चिंच गूळ मीठ चवीप्रमाणे
तूप फोडणीसाठी- १ चमचा
कृति
प्रथम भाजलेले शेंगदाणे, खोबरे, आले, जीरे, चिंच,मिरची किंवा तिखट मिक्सरवर पाणी घालून बारीक़ वाटून घ्यावे तुपावर जिरयाची फोडणी करायची आणि त्यावर हे वाटण घालायचे । एक उकळी येऊ द्यावी । जाड वाटल्यास थोड़े पाणी घालावे। गुळ व मीठ घालून गैस बंद करावा।
वरीच्या तांदळाच्या भाताबरोबर ही आमटी छान लागते .
No comments:
Post a Comment