हा प्रकार करायला सोपा आणि पटकन होणारा आहे.यात तेलाचा अजिबात वापर नाही तरीही चविष्ट लागणारा असा पदार्थ आहे।
साहित्य
पांढरा वाटाणा-१ वाटी
पातळ पोहे -२ वाट्या
कांदा-2
हिरव्या मिरच्या -२
खोवलेले खोबरे- १/२ - १ वाटी
तिखट-२ चमचे
गरम मसाला-१ च
साखर आणि मीठ चवीनुसार
कृति
पांढरे वाटाणे ५-६ तास भिजत घालावेत. मग त्यात १ कांदा चिरून आणि २ हिरव्या मिरच्या आणि २ वाट्या पाणी घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावेत।
पातळ पोहे,१ कांदा बारीक़ चिरून,ओले खोबरे,गरम मसाला ,मीठ,साखर सर्व एकत्र करावे.खायला देताना या पोह्यांवर ही वाटाणा उसळ घालावी.आवडत असल्यास वरून थोड़ी शेव घालावी।
No comments:
Post a Comment