Pages

Thursday, January 21, 2010

बाजरीचा मलीदा

थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्लेली चांगली। भोगीला म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे.पण भाकरी बरोबर भाजी किंवा चटणी लगते.भाकरी नुसती खाता येत नाही.पण बाजरीचा मलीदा हा प्रकार वेगळा आहे.तो भाकरीचाच प्रकार आहे पण नुसता खाता येइल असा!!
रात्री केलेली भाकरी उरली असेल तर सकाळी break-fast ला पटकन होणारा असा हा पदार्थ आहे.

साहित्य
बाजरीची भाकरी-२
गूळ-आवडीप्रमाणे
तूप-२ चमचे
बडीशेप-२ चमचे
ओले खोबरे-१/४ वाटी


कृति
बाजरीची भाकरी कुस्करावी(अगदी मिक्सर मधून काढली तरी चालेल अगदी ताजी केलेली असेल तर त्याचा चुरा नीट होणार नाही.शक्यतो ३-४ तास आधी केलेली किंवा आदल्या दिवशीची असेल तरी चालेल)चुराल्यावर तयार गूळ किसून घालावा तूप घालावे ओले खोबरे घालून नीट एकत्र करावे.मग त्यात बडीशेप थोड़ी भाजून कुटून घालावी.आवडत असल्यास काजू,बेदाणेही घातले तरी चांगले लागते.

यात बदिशेपेच्या ऐवजी तीळ आणि खसखस भाजून कुटून घातले तरी एक वेगळा प्रकार होऊ शकतो.

No comments:

Post a Comment