
दडपे पोहे २-३ प्रकारांनी करता येतात.हे करायला सोपे आणि खायला चविष्ट लागतात.यासाठी पटल पोहे वापरतात।
प्रकार-१
साहित्य
पातळ पोहे-२ वाट्या
शेंदेमीठ किंवा सैन्धव
साखर
लिम्बू
आले-थोडेसे किसून
ओले खोबरे-१/४ वाटी
डाळं-१/४ वाटी
कांदा-१ बारीक़ चिरून(optional)
फोडणीसाठी-तेल,मोहरी,हिंग,कडीपत्ता
कोथिम्बिर
कृती
एक पसरट भांड्यात किंवा परातीत पातळ पोहे घ्यावेत. ते नारलाच्या पाण्याने किंवा साध्या पाण्याने हलकेच भिजवावेत.(फार जास्ती पाणी घालू नये लगदा होतो)त्यात खोबरे,आले,कोथिम्बिर,डाळं,कांदा ,शेंदेमीठ,साखर घालून लिम्बू पिळावे.सर्व एकत्र करून थोड़े हाताने दडपावेत.एका पळीत तेल घालून फोडणी करून ती पोह्यांवर वरुण घालावी आणि मिक्स करावे.
No comments:
Post a Comment