
ही चटणी सुक्या खोबर्याची किंवा ओल्या खोबर्याचीही करतात. सुक्या खोबर्याची चटणी टिकते पण ओल्या खोबर्याची चटणी ही आयत्या वेळी करून खाण्यासाठी असते.
साहित्य
सुक्या खोबर्याचा किस-२ वाट्या
लसूण पाकळया-७-८
सुक्या मिरच्या किंवा तिखट-आवडीप्रमाणे
चिच व मीठ -चवीप्रमाणे
कृती
सुके खोबरे व सुकी मिरची तव्यावर खमंग भाजून घ्यावे.त्यात इतर सर्व साहित्य घालून मिक्सर मध्ये किंवा खलबत्यात चटणी कुटावी.
ताजी लसूण चटणी करताना खोवलेले ओले खोबरे घेउन त्यात तिखट,मीठ,चिंच घालून मिक्स करावे.त्यात लसूण ठेचुन घालावी.नीट एकत्र करावे.
No comments:
Post a Comment