
मक्याच्या दाण्यांची उसळ ही आपण पोहे करतो त्याप्रमाणेच करायची.मक्याच्या वेगळ्या चविमुळे ती चांगली लागते.मक्याचे दाणे पांढरेअसतील तर ते थोड़े ठेचुन घ्यावेत किंवा कणसे किसून घ्यावीत.जरा जून असतील तर नीट किसता येतात. कोवली कणसे असतील तर दाणे काढून थोड़े ठेचुन घ्यावेत.पिवळी कणसे किंवा sweet corn
कोवळीच असतात ती किसू नयेत त्यांचे दाणे मिक्सरमध्ये अगदी एकदाच फिरवून घ्यावेत किंवा ठेचुन घ्यावेत.हल्ली sweet corn बरही महीने मिळतात पण पांढरी कणसे फ़क्त पावसाळयात मिळतात आणि त्याची उसळ जास्त चविष्ट होते.
साहित्य
मक्याचे दाणे-२ वाट्या
फोडणीचे साहित्य-तेल,मोहोरी,हिंग,कडीपत्ता
ओले खोबरे आणि कोथिम्बिर
मीठ आणि साखर
लिम्बू
कृती
एक भांड्यात तेलामध्ये मोहरी,हिंग,व कडीपत्ता घालून फोडणी करावी.त्यात मक्याचे दाणे घालावे.अर्धी वाटी पाणी शिम्पडावे.झाकण ठेवून एक वाफ काढावी.मीठ आणि साखर घालावी.थोडेसे ओलसर ठेवावे. ओले खोबरे व कोथिम्बिर घालावी. लिम्बू पिळून गरम गरम खावे.
No comments:
Post a Comment