Pages

Saturday, February 6, 2010

jeera rice आणि tomatoche सार



हे combination खूपच चांगले लागते.jeera rice साठी तांदूळ बासमती असेल तर जास्त बरे.
भातासाठी साहित्य
बासमती तांदूळ-१ वाटी
तूप-२ चमचे
जीरे १ चमचा
सुक्या मिरच्या-२
हिंग-१ चमचा
मीठ चवीनुसार

कृती
तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.दुप्पट पाणी घालून कुकरमध्ये भात करून घ्यावा.भात झाल्यावर ताटात मोकळा करावा आणि गार होऊ द्यावा.एका पसरट भांड्यात तूप घालून जीरे घालून फोडणी करावी.हिंग घालून सुक्या मिरच्या घालाव्या.मग त्यावर भात घालावा .अलगद ढवळावे.मीठ घालून ढवळून गैस बंद करावा.

यात variation म्हणून फोडणीत कडीपत्ता तसेच सुक्या ऐवजी हिरव्या मिरच्याही घालू शकतो.वरून कोथिम्बिरही चिरून घातली तरी चांगले लागते।

tomato सारासाठी
tomatoes-२-३
ओले खोबरे-३-४ चमचे
कडीपत्ता-४-५
जीरे-१ चमचा
तूप-१ चमचा
हिरवी/लाल मिरची-1
लसूण (optional)-२ पाकळया
मीठ आणि साखर चवीनुसार
कोथिम्बिर सजावटीसाठी

कृती
कुकरमध्ये tomato शिजवून घ्यावेत.गार झाल्यावर शिजलेले tomato, (पाणी separate सारात घालावे),ओले खोबरे,लसूण अर्धा चमचा जीरे हे मिक्सर मध्ये बारीक़ वाटावे.एका भांड्यात तूप घालून त्यात जीरे व हिंग फोडणीला घालावे.कडीपत्ता व मिरच्या घालाव्या.मग त्यात tomato शिजवलेले पाणी घालावे.नंतर त्यात वरील वाटण घालावे. साखर घालावी.उकळी आल्यावर मीठ घालावे. गैस बंद करावा.कोथिम्बिर घालून सजवावे.

No comments:

Post a Comment