Pages

Saturday, February 6, 2010

लिम्बाचे सरबत

या सरबताची recipe मला माझ्या sister-in law ने दिली.
सारखे सारखे fizzy drinks पिण्यापेक्षा हे घरगुती लिंबू सरबत पिणे केव्हाही चांगले. हे सरबत उन्हाळयामध्ये fridge मध्ये करून ठेवले की dilute करून पाहिजे तेंव्हा पिता येते.आले घातल्यामुळे स्वाद वाढतो आणि आले पाचक असल्यामुळे आरोग्यलाही चांगले.


साहित्य
१० लिम्बे
६ ग्लास पाणी
१ किलो साखर
५० gm आले
थोडेसे चवीनुसार मीठ किंवा rock salt/सैन्धव



कृती
६ ग्लास पाण्यात साखर घालून गैस वर ठेवावे.आले(साल काढून) किसून त्यात घालावे.(आख्खे आले ठेचून घातले किंवा रस काढून घातला तरी चालतो).नंतर लिम्बाचा रस त्यात घालून साखर विरघळेपर्यंत्तच गरम करावे.(पाक करू नये)थंड झाल्यावर सरबत बाटलीमध्ये भरून fridge मध्ये ठेवावे. पिण्यासाठी घेताना १ भाग concentrate मध्ये ३ भाग पाणी घालून घ्यावे.
लिम्बू सरबत केल्यावर जी लिम्बे उरतात त्याचे गोंड लोणचे ही छान होते

No comments:

Post a Comment