Pages

Saturday, March 20, 2010

गुढीपाडव्याचा मेनू




Friday, March 19, 2010

aambadal


आंबाडाळ मराठी मधे



It's summer in India. Hot everywhere. thirsty throat and to quench the thirst the remedy is raw mango squash or 'kairiche panhe' as we call it in marathi. Panhe is often served with the dish called 'aambadal'. It is prepared of bengal gram or chick pea pulse. like squash it also contains raw mango hence the taste is sweet and sour.

Ingredients

chick peas- 1 cup( soak in 1 cup of water)
raw mango-(peeled and grated)- 1/2 cup
green chili-1
salt and sugar to taste
coriander leaves for garnishing
for tampering- oil-3-4 tea sp, mustard seeds-2 tea sp, asafoetida-2 tea sp., turmeric powder- 1 tea sp.
grated coconut- 2 tea sp (optional)

procedure-

coarsely grind soaked chick peas with salt,sugar and chili in a mixer.
Transfer the contents in a bowl and add grated raw mango init and mix well. Add cut coriander leaves.
Heat oil in a pan add mustard seeds, asafoetida. let it cool and then add turmeric powder. Mix this with chick pea's mixture.
Serve cold with raw mango squash.

आंबाडाळ



aambadal in english

चैत्र महिना सुरू झाला की आंबाडाळ आणि पन्हे करण्याची प्रथा आहे.या वेळेला हिरव्यागार कैर्यायायला लागतात आणि अप्रैल ,में चा कड़क उन्हाळा पन्ह्यामुळे जाणवत नाही.


साहित्य
चणाडाळ- १ वाटी
कैरीचा कीस- अर्धी वाटी
हिरवी मिरची-१
थोडीशी कोथिम्बिर
चवीनुसार साखर,मीठ
फोडणीसाठी तेल-३-४ टी स्पून
मोहरी- १ चमचा
हिंग-१ चमचा
हळद- १ चमचा
ओले खोबरे सजावटीसाठी ( optional)


कृती
डाळ बुडेल एवढ्या पाण्यात २-३ तास भिजवावी.
भिजलेली डाळ,हिरवी मिरची,मीठ,साखर मिक्सर मधे वाटावे। (फार बारीक़ वाटू नये.जास्ती पाणी घालू नये)
त्यात कैरीचा कीस घालावा आणि नीट मिक्स करावे।
तेल तापवून मोहरी हिंग घालून खमंग फोडनी करावी.थोड़ी गार झाल्यावर त्यात हळद घालावी.ही फोडणी डाळीच्या मिश्रणात ओतावी आणि सर्व नीट मिक्स करावे.वरून चिरलेली कोथिम्बीर घालावी.आवडत असल्यास खोबरे घालावे.ठण्ड करून खावी.बरोबर पन्हे असल्यास 'सोने पे सुहागा'

Tuesday, March 2, 2010

तिखट शिरा


तिखट शिरा हा एक सोपा breakfast होऊ शकतो.घाईच्या वेळेला पटकन करता येण्यासारखा हा पदार्थ आहे।

साहित्य
जाड़ा रवा- १ वाटी
गरम पाणी- २ - २|| वाट्या
फोडणीसाठी-तेल ,जीरे,हिंग,कडीपत्ता,हिरवी मिरची
हळद- १ टी स्पून
मीठ, साखर- चवीनुसार
खोबरे आणि कोथिम्बीर सजावटीसाठी
लिम्बू


कृती
एक भांड्यात २ -३ चमचे ( टी स्पून) तेल गरम करून त्यात फोडणीचे साहित्य घालून फोडणी करावी.त्यात रवा घालून तो चांगला परतावा.( मध्यम गैस वर ४-५ मिनिटे)त्यात हळद घालावी.२ ते अडीच वाट्या गरम पाणी घालावे.ढवळून झाकण ठेवावे.एक वाफ काढून त्यात मीठ व चवीपुरती साखर घालावी. लिम्बू पिळून ओले खोबरे व चिरलेली कोथिम्बिर घालून खायला द्यावे.

Thursday, February 25, 2010

वाटाणा उसळ /Watana Usal in marathi



Watana Usal


This is a very easy dish to prepare. You can use frozen green peas in case fresh peas are unavailable. But the 'bhaji' tastes awesome with the fresh green peas.

for this You need...

fresh green peas or watana- 2 cups
freshly ground coconut-1/2 cup
coriander leaves-1/2 cup
turmeric powder-1 t sp
salt to taste

for tadka
oil-2-3 tsp
mustard seeds-1 t sp
asafoetida-1 t sp
green chili-2

Method

Heat oil in a kadai
Give tadka of mustard seeds, asafoetida and green chili.
add turmeric powder and mix well
Cover with lid and put some water on the lid. simmer the flame and let it cook for 5-10 minutes
after it is cooked add coconut, coriander leaves and salt. Mix well
Usal is ready
Serve hot with chapati

Wednesday, February 24, 2010

watana usal in english


वाटाण्याची उसळ


Novembar ,December मधे भारतात भाज्या खूपच मस्त मिळतात.वाटाणे तर भरपूर असतात.
हा season म्हणजे उन्धीयु चा ,mutter pattice , mutter paneer आणि खूप काही.पण आज मी साधी, सोपी आणि चविष्ट वाटाणा उसळ किंवा वाटाण्याची भाजी दिली आहे.

अगदी सरळ कृती आहे.साहित्यही घरात असलेले नेहेमीचेच आहे.
तेलामधे मोहरी,हिंग (नेहमीपेक्षा थोडासा जास्ती)आणि हिरव्या मिरच्या(उभ्या चिरून)फोडणी करायची.
नंतर हळद घालून वाटाणे घालायचे.वर झाकण ठेवून त्यावर पाणी घालायचे आणि भाजी शिजू द्यायची. १०-१५ मिनिटात शिजतात.
मधे एकदा झाकण काढून हलावयाचे.
भाजी शिजल्यावर त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचे.ओले खोबरे आणि कोथिम्बिर चिरून घालायची।
गरम गरम भाजी ताज्या चपातीबरोबर खायची.

Tuesday, February 16, 2010

पावाचे उप्पिट

पाव उरला की काय करायचे?किंवा 'कड़ेचे slices कोणी खातच नाही'.तर अशावेळी पावाचे उप्पिट हे उत्तम solution.अगदी पोहे करतो तसेच करायचे.पण पोह्याची जागा पावाने घेतल्यामुळे चव वेगळी लागते.variation म्हणून brown bread असेल तर नक्कीच healthy होइल.